चोरीच्या आरोपावरून 2 दलित तरूणांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये ओतलं पेट्रोल, केली बेदम मारहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या नागौरमधून अशी काही धक्कादायक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्या की लोकांना समाज व्यवस्थेचा विचार करण्यास भाग पाडू शकतात. येथे चोरीच्या आरोपावरून दोन दलित तरुणांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, खासगी भागात पेट्रोल टाकण्यात आले, स्क्रूड्रायव्हरने चा देखील वापर करण्यात आला. हा व्हिडिओ आल्यानंतर पुन्हा एकदा दलित अत्याचाराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटद्वारे या घटनेची टीका केली असून राज्य सरकारला यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा नागौरचा व्हिडिओ काही दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या व्हिडीओमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये, दोन दलित तरुण बचावासाठी आरडाओरड करीत आहेत, मारहाण करणाऱ्यांकडे माफी मागत आहेत आणि वारंवार सोडण्याची विनंती करत आहेत, परंतु मारणाऱ्यांना याचा काहीच फरक पडत नाही. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने राज्यातील काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण आणि कुठला आहे व्हिडिओ?
हा व्हिडिओ राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील आहे. पाचौरी पोलिस स्टेशन परिसरातील करणू सर्विस सेंटर मध्ये दोन तरुणांवर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सर्विस सेंटरच्या कामगारांनी दोघांना बेदम मारहाण केली. घिसाराम आणि पन्नालाल हे दोन दलित तरुण काही कामानिमित्त सर्विस सेंटरवर गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई केली जात आहे. नागौर चे एएसपी (ASP) राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ १६ फेब्रुवारीचा आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कलम ३४२, ३२३, ३४१, १४३ आणि एससी/एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सात लोकांची नावे उघडकीस आली आहेत, त्यामध्ये भीम सिंग, ऐदान सिंग, जस्सू सिंग, सवाई सिंग यांचा समावेश आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांचा कसून तपासही सुरू आहे. या प्रकरणाचा तपास नागौर एएसपी राजकुमार, डीएसपी मुकुल शर्मा करीत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या घटनेवर ट्विट केले असून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. अशोक गहलोत म्हणाले, ‘नागौरमध्ये घडलेल्या भीषण घटनेत त्वरित कारवाई करण्यात आली असून, सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.’ ज्यांनी हे भयंकर कृत्य केले आहे त्यांना कडक शिक्षा केली जाईल.’

राहुल गांधींनी ट्विट करून दुःख व्यक्त केले
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत राज्य सरकारला कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘राजस्थानमधील नागौर येथून दोन दलित तरुणांना मारहाण करणारा व्हिडिओ समोर आला आहे, तो खूप भयानक आहे. मी राज्य सरकारला अपील करतो की यासंदर्भात कठोर कारवाई करावी आणि दोषींना शिक्षा करावी.’

या घटनेनंतर समाज कल्याण मंत्री भंवर मेघवाल यांनीही राज्य सरकारमध्ये निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, सरकार या प्रकरणात अत्यंत गंभीर आहे. पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, राज्यात दलितांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत.

भाजपने कॉंग्रेस सरकारला घेरले
दलित तरुणांना मारहाण केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया म्हणाले की, कॉंग्रेस सातत्याने लोक कल्याणकारी सरकार असल्याचा दावा करते, पण ते निंदनीय आहे. या प्रकरणात सरकारने कठोर पाऊल उचलले पाहिजे. तसेच भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी आरोप केले की कॉंग्रेस सरकार दलितांच्या संरक्षणाबाबत गंभीर नाही.

नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनीही या घटनेचा निषेध केला असून आयजीशी बोलले आहेत. गुरुवारी राजस्थान सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन अद्याप चालू आहे आणि विधानसभेत या विषयावर कॉंग्रेस सरकारला घेराव घालणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले.

You might also like