राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी 250 मुस्लीमांनी स्विकारला हिंदू धर्म !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल राममंदीर भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावांत राहणार्‍या 50 मुस्लीम कुटुंबातील 250 जणांनी हिंदू धर्म स्विकारला आहे. यावेळी सुभनराम यांनी सांगितले की, मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे असल्याचे सांगितले.

संपूर्ण कुटुंब गेल्या वर्षभरापासून हिंदू सण साजरे करत होते. त्यांच्या परिवारातील एका सदस्यानं सांगितले की, त्यांनी कधीच मुस्लीम पद्धतीने सण साजरे केले नाहीत. राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत होम-हवन करून संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्माचा स्वीकार केला. परिवाराने गावच्या संरपंचांना बोलवून हवन केला. पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते.

मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. गावचे सरपंड प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, आम्ही कोणालाही हिंदू धर्मचा स्वीकार करा असे सांगितले नव्हते. त्यानंतरही या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like