सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जाच ! भाजपच्या माजी आमदारासह 9 जणांना अटक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट असून, वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. पण काही ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. राजस्थानातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

राजस्थानच्या धौलपूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार सुखराम कोहली उपस्थित होते. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यामध्ये पोलिसांनी सुखराम कोहली यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आता राजस्थान राज्यात आढळत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता ही रुग्णसंख्या कमी झाली आहे. पण राजस्थानात सर्वाधिक रुग्णसंख्या असतानाही अशाप्रकारे कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याने रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.