काँग्रेसच्या ‘त्या’ 19 आमदारांनी राजीनामा दिला तर ? जाणून घ्या राजस्थानातील संख्याबळ

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील सत्ता संघर्ष कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार उपस्थित राहिले. यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचं बंड मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण बैठकीला अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे किमान 19 आमदार नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गेहलोत आमदारांसोबत माध्यमांसमोर आले आणि त्यांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत सरकार टिकणार असल्याचे सूचित केलं. मात्र गेहलोत यांच्या बौठकीला पायलट यांच्यासह किमान 19 आमदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरील संकट कायम असल्याचे दिसत आहे.

आपल्याकडे 25-30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पायलट गटाने केला होता. मात्र, आजच्या दुपारच्या बैठकीला 19 आमदार गैरहजर होते. मध्य प्रदेश प्रमाणे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिले तर विधानसभेतील आमदारांची संख्या 200 वरून 181 होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी 91 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असेल. तर विधानसभेत भाजपचे 72 आमदार आहेत. याशिवाय आरएलपीच्या 3 आमदरांचा पाठिंबा आहे.

दुसरीकडे गैरहजर राहिलेल्या 19 आमदारांनी राजीनामा दिला तर गेहलोत यांच्याकडे 88 आमदारांसह लहान पक्षांच्या काही आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते सहज सत्ता टिकवू शकतील. काँग्रेसच्या 25 ते 30 आमदारांनी राजीनामे दिल्यास भाजपला राजस्थानात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करता येईल. मात्र त्यांना लहान पक्षांसह अपक्षांना देखील हाताशी धरावं लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like