राजस्थानमध्ये फ्लोअर टेस्टची मागणी, मुख्यमंत्री गहलोत म्हणाले – ‘देवानं एवढी तर अक्कल दिली असेल’

नवी दिल्ल्ली : वुत्तसंस्था –   राजस्थान कॉंग्रेसच्या आत सुरू असलेल्या राजकीय गदारोळात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलटवर मोठी कारवाई केली आहे. कॉंग्रेसनेही पायलट यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढून उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त केले आहे. भाजपाजवळ आता फक्त फ्लोर टेस्टच शेवटचा मार्ग आहे. सचिन पायलट किंवा भाजपा दोघांचाही गहलोतद्वारे केलेल्या बहुमत दाव्यावर विश्वास नाही. अशा परिस्थितीत फ्लोर टेस्टची मागणी सातत्याने केली जात आहे, यावर मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, देवाने एवढी अक्कल तर दिली असेल कि फ्लोर टेस्टची मागणी कधी व कशी करावी.

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. या दरम्यान सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांना काढून टाकल्याची माहिती दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सचिन पायलट भाजपच्या हाताने खेळत आहेत. देशात असे सरकार आले आहे, जे पैशाच्या बळावर राज्यातील इतर सरकारांना तोडत आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही कॉंग्रेसचे सरकार काढून टाकण्याचे षडयंत्र चालू होते, त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

फ्लोर टेस्टच्या प्रश्नावर गहलोत म्हणाले की, देवाने एवढी बुद्धी तर दिली असेल. कॉंग्रेसचा कोणताही आमदार फ्लोअर टेस्टची मागणी करू शकत नाही. जर त्यांची काही तक्रार असेल तर ते विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याबाबत बोलू शकतात आणि तेथे आपले म्हणणे मांडू शकते आणि जर मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याशी ते सहमत नसतील तर ते राजीनामा देण्यास सांगू शकतात. फ्लोअर टेस्टची मागणी करून सचिन पायलट यांनी सिद्ध केले कि, , भाजपाच्या पाठिंब्याने ते सरकार पाडतील. तसेच अशोक गहलोत म्हणाले कि, मजबुरीने हा निर्णय घ्यावा लागला. ‘शेवटी, हाय कमांडला सक्तीने निर्णय घ्यावा लागला, कारण भाजप दीर्घ काळापासून कट रचत होता. आम्हाला माहित आहे की हे षडयंत्र खूप मोठे आहे आणि घोडे व्यापार चालू आहे. ही परिस्थिती त्या मुळे निर्माण झाली आहे. आमच्या काही सहकाऱ्यांची दिशाभूल झाली ते दिल्लीला गेले.

सीएम गहलोत पुढे म्हणाले की, सचिन पायलटच्या हातात काहीही नाही, संपूर्ण खेळ भाजपच्या हातात आहे. रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे, संपूर्ण व्यवस्था भाजपकडे आहे. जो संघ यापूर्वी मध्य प्रदेशात व्यवस्था करत होता, तोच संघ यावेळी व्यवस्था करीत आहे. त्यांना एकाच ठिकाणी यश मिळालं आहे, म्हणूनच इथेही तेच करायचे आहेत. आमदारावर जनतेचा दबाव असा आहे की त्यांना पाच वर्षांसाठी पाठविण्यात आले आहे आणि ते दीड वर्षातच असे करीत आहेत.

त्याचवेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘कॉंग्रेसचे नेतृत्व वारंवार सांगत आहे की सचिन पायलट यांना लहान वयात देण्यात आलेली राजकीय सत्ता कदाचित कुणालाही मिळाली नव्हती. वयाच्या 30-32 व्या वर्षी त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. वयाच्या 34 व्या वर्षी राजस्थानच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. वयाच्या 40 व्या वर्षी उपमुख्यमंत्री केले. याचा अर्थ असा आहे की अशा अल्पावधीत एखाद्यास प्रोत्साहित करणे, म्हणजे सोनिया आणि राहुल यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत.

सुरजेवाला म्हणाले की, गेले चार दिवस कॉंग्रेस असे म्हणत आहे की, जर कोणी सर्व प्रकरण विसरून परत येत असेल तर ऐकून घेतले पाहिजे, परंतु खेद आहे की, पायलट आणि त्याचे काही सहकारी 8 कोटी राजस्थानी लोकांकडून निवडून आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.