गेहलोत मुख्यमंत्री नको, सचिन पायलट यांच्या नव्या मागणीने खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास पायलट यांनी नकार दिला आहे. पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीघ लागली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय नाट्याने नवीन वळण घेतले आहे. अशोक गहलोत यांनी बहुमतासाठी 105 आमदाराचा पाठिंबा असल्याचे सिद्ध केल्यानंतर सरकार स्थिर राहणार असे स्पष्ट झाले होते. पण, त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांनी समर्थकांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिली आहे. त्यांच्या जागी दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, पण गहलोत यांना मुख्यमंत्रिपदी ठेवू नका, अशी मागणीच केली आहे. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीलाही पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी नकार दिला. काँग्रेस पक्षाकडून अजूनही पायलट यांच्यावर कोणतीही कारवाईचे संकेत दिले नाही. त्यांच्या आवडीचे खाते देण्याची ऑफरही देण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद ही कायम राखले जाणार असल्याचंही पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही पायलट आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.