तब्बल 22 वर्षापुर्वीचं शुटिंग पण आता चालणार सनी देओल आणि करिश्माविरूध्द खटला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २२ वर्षानंतर जयपूरच्या रेल्वे कोर्टाच्या अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याविरूद्ध परवानगीशिवाय ट्रेनमध्ये शूटिंग केल्याबद्दल आरोप केले आहेत. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या दोघांनीही जनतेला धोक्यात घालून विना परवानाशिवाय ट्रेनमध्ये शूटिंग करुन रेल्वेची मालमत्ता वापरली आहे.

ही 1997 ची ही घटना आहे जेव्हा सनी देओल आणि करिश्मा कपूर जयपुरजवळ फुलेरा येथे ट्रेनमध्ये शूटिंग करत होते. या प्रकरणात टीनू आनंद आणि सतीश शहा यांनाही आरोपी करण्यात आले होते. स्टेशन मास्तरांनी असा दावा केला होता की, या लोकांनी परवानगी न घेता ट्रेन पकडली आणि तिथे ट्रेनमध्ये 5 हजार ते 10 हजार लोक बसले आणि कॅमेऱ्यासह त्यांचे शूटिंग केले. यामुळे केवळ रेल्वेचेच नुकसान झाले नाही तर त्यामुळे जीवित व मालमत्तेचेही नुकसान झाले असते.

२०१२ मध्ये या प्रकरणात कोर्टाने सतीश शाह आणि टीनू आनंदला आरोपी मानले होते, परंतु सनी देओल आणि करिश्मा कपूर यांनी स्वत: च्या निर्दोषपणाबद्दल कोर्टात याचिका दाखल केली. बुधवारी कोर्टाने असा निर्णय दिला आहे की, या प्रकरणात सनी देओल आणि करिश्मा कपूर देखील आरोपी आहेत.

पोलिस तपासात सर्व लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती आणि हे प्रकरण बनत नाही असे सांगण्यात आले. परंतु स्वत: कोर्टाने या प्रकरणातील प्रत्येकाला नोटीस बजावली. आता पुढील कारवाईत सनी देओल आणि करिश्मा कपूर यांच्या विरोधात खटला दाखल होईल.

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like