दोघांचा एकाच शेळीवर दावा, मुक्या प्राण्यानेच लावला प्रकरणाचा छडा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यास्थानमधील उदयपूरमधील खेरोदा पोलिस स्टेशनमध्ये एका शेळीचे दोन मालक असल्याचा वाद आला होता. खेरोदा पोलिस स्टेशनमधील आधिकार्‍यानं दोन्ही मालकांना शेळीच्या करडाला घेऊन उपस्थित राहायला सांगितले होते. त्यानंतर शेळीला बाहेर सोडण्यात आले. त्यावेळी शेळी करडाजवळ गेली अन् दुध पाजले. अशा प्रकारे मुक्या प्राण्याने अवघड प्रकरण एका क्षणात सोडवले आहे.

धोलाकोट गावात राहणार्‍या बाबरु रावत यांची शेळी चंगलात चरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी शेळी हरवली. बाबरु रावतने शेळीला आजूबाजूच्या परिसरात आणि गावात शोधले असता त्यानंतर 4 किमी असणार्‍या मासिंगपुरा गावात डांगफला येथे शेळी असल्याची माहिती त्यांना मिळाली. बाबरु शेळी आणण्यासाठी मासिंगपुरा गावात उंकारलाल रावत यांच्या घरी पोहचले त्यावेळी शेळी तेथेच बांधलेली दिसली.

उंकारलाल यांनी ती शेळी माझीच असल्याचे सांगत बाबरुला तेथून हाकलून दिले. त्यानंतर बाबरु यांनी शेळीची तकृार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी पहिल्यांदा दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्यास तयार होईना. अखेरीस शेळी कोणाची हा प्रश्न त्याच मुक्या प्राण्यावर सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पोलीस आधिकार्‍याने शेळी आणि त्याच्या करडाला घेऊन येण्यास सांगितले. बाबरु आणि उंकारलाल जवळ असलेल्या करडाच्या मध्ये शेळीला उभे करण्यात आले. त्यानंतर शेळीने बाबरुजवळ असलेल्या करडाला जाऊन दूध पाजले. तर उंकारलालच्या करडाला शिंगाने दूर सारले.