खळबळजनक ! तब्बल ६५ महिला शिक्षकांना बलात्काराची धमकी, पोलिसांकडे तक्रार

राजस्थान : वृत्तसंस्था – जिथे प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व वाढत आहे तिथंच त्यांच्यावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजस्थानमध्ये एक धक्का दायक घटना समोर आली आहे. राजस्थान विश्वविद्यालयातील तब्बल ६५ महिला शिक्षकांनी लैंगिक छळाची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या महिला शिक्षकांना कोणी अज्ञात व्यक्ती फोन करून बलात्काराची धमकी देत आहे. तसंच त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत असल्याची माहिती या महिलांनी पोलीसांना दिली आहे. फोन करून धमकी देणारा हा अज्ञात व्यक्ती आमचा पाठलागही करतो, असंही या महिलांनी सांगितलं आहे. ६५ महिलांनी एकत्रित तक्रार दाखल केल्यामुले परिसरात भितीचे वातावरण आहे.

घडलेल्या घटनेमुळे राजस्थान युनिव्हर्सिटीतीळ महिला प्रोफेसर घाबरलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीच्या कॉलमुळे या महिलांमधील अधिक महालांनी युनिव्हर्सिटीत येणं देखील बंदच केलं आहे. पोलीसही धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात लागले आहेत.

फोन करणारा अज्ञात व्यक्ती हा वेळकाळ न पाहता दिवस रात्र कधीही फोन करतो आणि अश्लील भाषेत बोलतो. त्याला बोलताना अडवले तर तो सरळ बलात्काराची धमकी देतो. सोमवारी तर या नराधमांनी हद्दच पार केली आणि काही महिला प्रोफेसर यांच्या घरी कॅश ऑन डिलेव्हरीने भेटवस्तू पाठवविले आहेत. तसंच त्यासोबत बलात्काराची धमकीही पाठवली आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजस्थान युनिव्हर्सिटीने युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरील सर्व महिला प्रोफेसर यांचे फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि अन्य माहिती डिलीट केली आहे. तर जयपूरमधील मुलींचे महाराणी कॉलेजच्या प्रिंसिपलनेही यासंबंधी माहिती दिली आहे. त्याच्यानुसार पीडित महिला प्रोफेसरांनी संख्या जवळपास १५० आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे. महाराणी कॉलेजच्या शिक्षिका सुद्धा खूप घाबरलेल्या परिस्थितीत आहेत. राजस्थान युनिव्हर्सिटीत ३५ विभागांत २३० महिला प्रोफेसर आहेत. त्यापैकी जवळपास १५० जणांनी युनिव्हर्सिटी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महेश नगर आणि गांधी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अज्ञात आरोपी इंटरनेटद्वारे एका विशेष सॉफ्टवेअरने फोन करत आहे, त्यामुळे तो फोन नंबर ट्रेस करणे अवघड झाले आहे. मात्र आयी तज्ञ याविषयी माहिती काढत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. तर पोलिसांनी +1226 793 577, +92310 773 052, +1052 428 332, +1313 497930 या क्रमांकाहून फोन आल्यास तो रिसिव्ह न करता पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात