अविश्वसनीय ! भारतात महिलेनं एकाचवेळी 5 मुलांना दिलाय जन्म

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – राजस्थानच्या जयपूर रुग्णालयातील एका महिलेने शनिवारी एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला, जनाना रुग्णालयाचेे अधीक्षक लता राजौरिया यांनी सांगितले की प्रसुती दरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला, तर एका मुलाला वेंटिलेटरवर ठेवले आहे. बाकी तीन मुलांच्या आरोग्याकडे डॉक्टर लक्ष देऊन आहे.

ते म्हणाले की शुक्रवारी रात्री रुक्साना (25) यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी 5 प्री मॅच्यूअर मुलं (पूर्णपणे विकसित न झालेले) जन्माला आली. त्या एका नवजात मुलाचा मृत्यू झाला.

त्या म्हणाले की, दोन मुली आणि दोन मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्यात येत आहे, सर्वच मुले कमजोर आहेत, त्यांचे वजन देखील कमी आहे. महिला सांगनेरची रहिवासी आहे, यात मृत झालेले नवजात बालक मुलगा आहे.

तर डॉक्टरांनी सांगितले की हे प्रकरण एक दुर्लभ प्रकरण आहे. परंतू असे प्रकार पहिल्यांदा देखील समोर आले आहेत. ज्यात दोन, तीन, चार पर्यंत मुलं जन्माला येत होती.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like