राजस्थानच्या अ‍ॅन्टी करप्शनची (ACB) मोठी कारवाई ! 2 लाखांची लाच घेताना महाराष्ट्रातील ‘या’ आयुक्तालयातील पोलिस उपनिरीक्षकासह चौघा पोलिसांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन – लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या चार पोलिसांना दोन लाखांची लाच घेताना अटक झाली आहे. यामध्ये एका अधिकार्‍याच्या समावेश आहे. तर तीन कॉन्स्टेबलच्या समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही पोलीस बोरिवलीतील पोलिस ठाण्यात कार्य बजावीत आहेत. एका प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हे चारही जण जयपूरला आले होते. त्याच वेळी त्यांना लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. त्यात बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, कॉन्स्टेबल लक्ष्मण, सुभाष पांडुरंग आणि सचिन गुडके अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांनी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे.

 

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, शिंदे आणि त्यांचे पथक जयपूरला विनोदला अटक करण्यासाठी गेले. तेव्हा त्याच्या वडिलांना ही अटक करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडून दोन लाखांची मागणी केली असा आरोप आहे. त्यानुसार त्यांच्या घरमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मुंबईत राहणारा विनोद कापड व्यापारी आहे. तो बोरिवलीत भाडेतत्त्वावर दुकान चालवतो. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like