तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास कळलाच नाही : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहांनी सेना-भाजपा युतीची घोषणा केली आहे. तसेच स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सेना-भाजपा युतीवर टीकास्त्र सुरु केले आहे. ते म्हणतात , माफ करा राजे… तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्त्व कळलेच नाही. अशा शब्दात नितेश राणेंनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्याच रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही. नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. राणेंवर खरमरीत टीका करायला शिवसेना विसरत नाही अन् शिवसेनेचे वाभाडे काढायला नितेश राणे नेहमीच तयार असतात. आता नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या चांगलाच समाचार घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीची नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली आहे . असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला होता. नितेश राणेंनी सामनातील या अग्रलेखाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. बायको असावी तर शिवसेनेसारखीच…. असेही ट्विट राणेंनी केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us