‘कास्टिंग काऊच म्हणजे बलात्कार नव्हे’ : राजीव खंडेलवाल

पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपटसृष्टीत तुमच्याकडे नेहमीच ‘नाही’ म्हणण्याची संधी असते, असे म्हणत अभिनेता राजीव खंडेलवालने कास्टिंग काऊचवर मत व्यक्त केले आहे. दोन चित्रपटांची ऑफर देण्याच्या बदल्यात राजीवकडून शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. मात्र राजीवने साफ नकार दिल्याचे सांगितले.कास्टिंग काऊच करणाराच फक्त जबाबदार नसतो तर ते करू देणारी व्यक्तीसुद्धा तितकीच जबाबदार असते. असेही त्यांनी स्पष्ट केले.

कास्टिंग काऊच म्हणजे तुम्ही अशा गोष्टीत सहभागी होता ज्यातून तुम्हाला काहीतरी मिळणार असते. राजीवने त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंग सांगितला आहे. दोन चित्रपटांची ऑफर मला देण्यात आली होती. मात्र मी ती साफ नाकारली कारण त्यात माझ्याकडून शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. त्याऐवजी मी एका छोट्या बजेटच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कारण माझ्या कामावर मला विश्वास होता. माझ्या अटी-शर्तींवर मला काम मिळवायचे होते आणि ते मला मिळाले. पण आता त्या व्यक्तीचे नाव मी उघड करावे का? तर नाही. कारण त्या व्यक्तीने माझा बलात्कार केला नाही. त्याने मला फक्त कामाच्या बदल्यात दुसरा पर्याय दिला आणि तो पर्याय निवडायचा की नाही हा माझा निर्णय होता. राजीव खंडेलवालने टीव्हीपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.