काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ? …तर बाहेर पडू, ‘RPI’ (गवई गट) चा ‘इशारा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अचलपूर आणि दर्यापूरची जागा दिली नाही तर चर्चा करणार नाही, असा इशाराच आरपीआय नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडूंच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त करुन दाखवली. यामुळे विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अचलपूर आणि दर्यापूर या दोन जागांवर कोणतीही तडजोड करणार नाही. या जागा मिळाल्या नाही, तर स्वबळावर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू, मग आम्हाला भाजपची ‘बी’ टीम म्हणू नका, असा इशारा देखील राजेंद्र गवई यांनी राष्टवादीला दिला. दर्यापूर आणि अचलपूर या दोन विधानसभेच्या जागा दिल्या नाही, तर आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे. गवई गटाने कॉग्रेस राष्ट्रावादी आघाडीकडे 10 जागांची मागणी केली आहे.

राजेंद्र गवई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर यावर चर्चा करणार असलेचे देखील त्यांनी सांगितले. याशिवाय वंचितने आघाडीबरोबर येईल निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील अशा अपेक्षा देखील वर्तवली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –