श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मुलाला 12 जणांकडून ‘बेदम’ मारहाण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन : (हनुमंत चिकणे) –  पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. १४ ) रात्री आठच्या सुमारास हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून श्रीगोंदा येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा पृथ्वीराज नागवडे याला लोखंडी रॉड, टॉमी, कंबरेच्या पट्ट्याने आकरा ते बारा जणांनी  केल्याची घटना घडली.

या घटनेत पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (वय – २५, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा, जी. अहमदनगर ) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे व इतर पाच ते सहाजणावर पृथ्वीराज नागवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पृथ्वीराज नागवडे व त्यांचे दोन मित्र योगेश भोईटे (रा. सांगवी, ता, श्रीगोंदा जि. अहमदनगर ) व मनीष जाधव (रा. दौंड, ता. दौंड जि. पुणे ) हे संध्याकाळी कोरेगाव पार्क येथे दोन चारचाकी गाड्या घेऊन चालले होते. रात्री आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी ग्रीन येथील भारत पेट्रोल पंपाशेजारी आले असता डिव्हायडरमधून पुण्याकडे जाण्यासाठि अचानक आडवे आले व ब्रेक मारून हॉर्न वाजवला. त्यावेळी चालक बाजूची काच खाली घेतली असता दुचाकीवरील निलेश दिवेकर व त्याचे वडील (नाव व पत्ता पूर्ण माहिती नाही ) दोघे हॉर्न का वाजवला म्हणून शिवीगाळ व मारहाण करू लागले. गाडीच्या पाठीमागे दुसर्‍या गाडीमध्ये असणारे योगेश भोईटे व मनीष जाधव हे भांडणे सोडवण्यासाठी तिथे आले. त्यावेळेस त्यांनी समजावून सांगून सोलापूर बाजूने जाण्यास संगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या