शिवसेना झाली अधिक ‘शक्तीमान’, ‘या’ अपक्षानं पाठिंबा दिल्यानं संख्याबळ ‘एवढं’ झालं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता समीकरणं जुळताना दिसत नाही. सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेला विलंब होतं आहे. दरम्यान भाजप शिवसेना दोन्ही युतीत विधानसभा लढणारे पक्ष आता मात्र आपल्याकडे स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहे. असे असताना शिवसेनेला आज आणखी एका अपक्ष आमदाराने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 64 वर पोहचले आहे. कोल्हापूर शिरोळ मतदारसंघातील राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी रात्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत पाठिंबा दर्शवला.

राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून तब्बल 90 हजार मतांनी शिवसेनेच्या उल्हास पाटलांचा 27 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला होता. आता याचा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, कामगारांना न्याय,गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेना मिळवून देऊ शकते या विश्वासाने शिवसेनेला पाठिंबा देत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून शिरोळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना आणि ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

शिवसेनेला पाठिंंबा देणारे आमदार (शिवसेना 56 + अपक्ष + इतर पक्ष = 64)

1. राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी) – मेळघाट (अमरावती)
2. बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पार्टी) – अचलपूर (अमरावती)
3. राजेंद्र पाटील (अपक्ष) – शिरोळ (कोल्हापूर)
4. मंजुळा गावित (अपक्ष) – साक्री मतदारसंघ (धुळे)
5. नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) – भंडारा (भंडारा)
6. शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
7. आशिष जैस्वाल (अपक्ष) – रामटेक (नागपूर)
8. चंद्रकांत पाटील (अपक्ष) – मुक्ताईनगर (जळगाव)

पक्षांना मिळालेल्या जागा –

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन वंचित आघाडी – 3
एमआयएम – 2
प्रहार – 2
सपा – 2
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 1
स्वाभिमानी पक्ष – 1
रासप – 1
मनसे – 1
शेकाप – 1
माकप – 1
जनसुराज्य – 1
अपक्ष – 13

Visit : Policenama.com