‘या’ अपक्ष उमेदवाराची जीभ घसरली, भाजप नेत्याच्या पत्नीबाबत आक्षेपर्ह वक्तव्य

सोलापूर (बार्शी) : पोलीसनामा ऑनलाइन – बार्शी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवणारे राजेंद्र राऊत यांनी भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. राजेंद्र राऊत यांच्या टीकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे नेते आणि गृहनिर्माण मंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांना पाठिंबा दिल्याने राऊत यांचा तिळपापड झाला आहे. मिरगणे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी चक्क त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचे पहायला मिळत आहे.

राजेंद्र मिरगणे हे टेंडरसाठी स्वत:च्या बायकोला विकणारी मिरगणेंची ही औलाद, माझ्याबद्दल काय बोलतोय, अशी खालच्या शब्दात टीका केली. त्यामुळे बार्शी तालुक्यातून अपक्ष उमेदवार राऊत यांच्याविरोधात निषेधाचा सूर पहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री दर्जाचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांना पाठिंबा दिल्याने राऊत यांनी वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली असल्याचे सोपल गटाचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तर बार्शी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे घेऊन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही राऊत विरुद्ध सोपल अशीच होणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी