लोणी कोळभोरच्या उपसरपंच पदी राजेंद्र यशवंत काळभोर यांची बिनविरोध निवड

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर गावच्या उपसरपंच पदी राजेंद्र यशवंत काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया सरपंच अश्विनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

लोणी काळभोर हे पुणे शहराचे उपनगर म्हणून उदयास येत असून मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. नुकतेच येथील उपसरपंच सीमा काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज सरपंच अश्विनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात राजेंद्र काळभोर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तसेच हवेली तालुक्यातील जेष्ठ नेते माधव काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, पंचायत समितीचे उपसभापतीचे सनि काळभोर यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतला.

नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार सरपंच यांनी केला. यावेळी माजी सरपंच वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like