Rajesh Kale Solapur |’त्या’ प्रकरणात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरचे उपमहापौर (Solapur Deputy Mayor) राजेश काळे (Rajesh Kale Solapur) यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad) आणि पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूर येथून तडीपार (tadipaar) करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल (CP Harish Baijal) यांनी हे आदेश काढले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर (DCP Dr. Vaishali Kadukar) यांनी दिली आहे. राजेश काळे (Rajesh Kale Solapur) यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

राजेश काळे (Rajesh Kale Solapur) हे भाजपचे निलंबित नगरसेवक (Suspended BJP corporator) आहेत. काळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा, मारहाण असे 7 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे (Dhanraj Pandey) यांना अर्वाच्च आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणात राजेश काळे यांना अटक (Arrest) देखील करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राजेश काळे हे महापालिकेत आर.के. (RK) या नावाने ओळखले जातात.

राजेश काळे यांच्यासह चेतन गायकवाड (Chetan Gaikwad) यालाही सोलापूर, उस्मानाबाद आणि इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. गायकवाड याच्यावर खून (Murder), खुनाचा प्रयत्न (attempt murder) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरसेवक नागेश गायकवाड (Nagesh Gaikwad) यांचे ते पुत्र आहेत. आज (बुधवार) पहाटे पाच वाजता उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी (vijapur naka police station solapur) ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाईला पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दुजोरा दिला आहे.

 

आपल्यावर राजकीय द्वेषातून यापूर्वी अनेक खोटे आरोप झाले असून ही कारवाई देखील राजकीय द्वेषातूनच करण्यात आली आहे. याप्रकरणी आपण न्यायालयात (Court) दाद मागणार असल्याचे राजेश काळे (RK Solapur) यांनी सांगितले.

 

Web Title :- Rajesh Kale Solapur | solapur deputy mayor rajesh kale gets tadipaar notice CP Harish Baijal DCP Dr. Vaishali Kadukar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Suresh Jadhav | लस निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान देणारे ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

Shilpa Shetty | ‘अक्कल’ बदाम नाही तर धोका खाऊन येते, ‘या’ व्यक्तीने दिला शिल्पा शेट्टीला सल्ला; पाहा व्हिडीओ

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती