सकल मराठी समाज पुरस्कृत राजेश खडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार घोषीत झाले आहेत. त्याचबरोबर शहरातील विवीध सामाजिक संघटना व पक्षांनीही आपले उमेदवार देवून लढत रंगतदार करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. अशातच पुण्यात विवीध आंदोलन व उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असणारी संघटना सकल मराठी समाज वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेश खडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे लोकसभेच्या निवडणूकीत बहुजन चळवळीत कार्यरत असणारे राजेश खडके हे विवीध सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणारे म्हणून परीचित आहेत. निवडणूकी दरम्यान विवीध सामाजिक संघटनाचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मला मिळेल असे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सकल मराठी समाज संलग्नित संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामधे मानवधिकार महासंघाचे अशोक माने, सकल मराठी समाजाचे अंकुश गायकवाड, भिमसाम्राज संघटनेचे गणेश भोसले, बहुजन मोर्चाचे फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते सामिल होते.