निवडणुकीत 3 माजी पोलीस अधिकाऱ्यांचा पराभव पण ‘हे’ आले निवडून

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या पोलीस अधिकारी राजेश पडवी यांनी नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पडवी यांनी काँग्रेसच्या पद्माकर वाल्मीकि यांचा 7000 मतांनी पराभव केला. तर आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

नोकरीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश
पडवी यांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर आपल्या नोकरीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबईच्या अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. 2014 मध्ये पडवी यांच्या वडिलांनी म्हणजेच उदयसिंह पडवी यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. यांनतर त्यांचे सहकारी अधिकारी राजेश काळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, त्यांच्या विजयाचा मोठा आनंद झाला असून आम्ही काही काळासाठी एकत्र काम केले होते.

एनकाउंटर स्पेशलिस्ट’ प्रदीप शर्मा पराभूत
पडवी यांनी या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये प्रदीप शर्मा यांचा समावेश असून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर शमशेरखान पठान आणि गौतम गायकवाड या दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा