घटस्पोटानंतर रेल्वेच्या इंजिनिअरनं केलं होतं ‘लिंग’ परिवर्तन, 2 वर्षानंतर रेल्वेनं मान्य केलं ‘वास्तव’

गोरखपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. येथील एक व्यक्ती रेल्वे इंजिनियरपदावर करतो आणि तीन वर्षांपूर्वी त्याने आपले लिंग परिवर्तन करू घेतले होते. सरकारी कागदपत्रातील नोंदीनुसार तो अजूनही पुरूषच होता, ज्यास नंतर रेल्वेने महिला म्हणून मान्यता दिली.

या रेल्वे इंजिनियरचे नाव राजेश पांडे होते, तो तीन वर्षापासून रेल्वेच्या रेकॉर्डमध्ये महिला म्हणून नोंद करण्यासाठी लढा देत होता. आता लिंग परिवर्तनानंतर त्याची कागदोपत्री नोंदीसाठी सुरू असलेली धडपड पूर्ण झाली आहे. राजेशचे नाव आता सोनिया झाले आहे. परंतु, रेल्वेच्या रेकॉर्डमध्ये त्याचे केवळ लिंग बदलले आहे परंतु, नाव बदलण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी मुख्य व्यवस्थापक इज्जतनगर यांनी कामगार विभागाला पत्र लिहून सांगितले होते की, रेल्वे बोर्डाचा अंतिम आदेश येईपर्यंत राजेश पांडेला महिला मानण्यात यावे. याच निर्देशानंतर राजेश पांडे उर्फ सोनियाच्या मेडिकल कार्डमध्ये लिंग बदलून महिला करण्यात आले आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण…
राजेश पांडे इज्जतनगरच्या मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयात तांत्रिक ग्रेड-एक पदावर कार्यरत आहे. त्याने अधिकार्‍यांना विनंती केली होती की, त्याची रेल्वेच्या रेकॉर्डमधील नोंद महिला म्हणून करण्यात यावी. प्रकरण आगळेवेगळे असल्याने इज्जतनगर मंडळाने हे प्रकरण पूर्वोत्तर रेल्वेच्या जीएम कार्यालयाला दिशा-निर्देश मागण्यासाठी पाठवले. जीएमने हे प्रकरण बोर्डाकडे पाठवले. शेवटी रेल्वेने राजेशच्या मेडिकल कार्डवरील लिंग बदलून महिला म्हणून नोंद केली आहे.

मुख्य कारखाना प्रशासनाने मेडिकल बोर्डाच्या रिपोर्टच्या आधारे जेंडर डिस्फोरिया (एक लिंग ते दूसरे लिंग) अंतर्गत महिला म्हणून ओळख दिली. सोनियाला वडीलांच्या मृत्यूनंतर अनुकंप तत्वावर 2003 मध्ये बरेलीच्या वर्कशॉपमध्ये इंजिनियरची नोकरी मिळाली होती.

धुमधडाक्यात झाले लग्न
राजेशचे लग्न 2012 मध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते. परंतु, सहा महिन्यानंतर तो आपल्या पत्नीपासून विभक्त झाला. आणि दोन वर्षात त्याने घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बरेलीच्या अनेक सेक्सोलॉजिस्टकडे संपर्क साधला. नंतर तो दिल्लीला गेला आणि दिल्लीत सर्जरी करून त्याने लिंग परिवर्तन करून घेतले. डिसेंबर 2017 मध्ये सर्जरी करून तो पुन्हा बरेली येथे आला आणि सोनिया झाला.