‘या’ व्यापार्‍यानं आगामी वर्षभर तांदळाचे दर कसे राहतील हे सांगितलं (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम यावर्षी झालेल्या धुव्वाधार पावसात पिकांचे मोठयप्रमाणात नुकसान झाल्याने अगदी भाजीपाल्यापासून धान्याचे उत्पादन घटणार आहे. अशा परिस्थितीत रोजच्या जेवणातील ‘तांदळाच्या’ दराचीही चिंताही सतावणार असेल, हे निश्चित. परंतु तूर्तास तरी आंबेमोहोर आणि इंद्रायणी या स्थानिक तांदळाचे उत्पन्न घटल्याने दर चढे राहणार असले तरी इराण आणि आखातात होणारी बासमती ची निर्यात थांबल्याने आता बासमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे.

पुढील वर्षभरात तांदळाचे दर कसे राहतील यावर मार्केटयार्ड येथील तांदळाचे होलसेल व्यापारी जयराज अँड सन्स चे संचालक राजेश शहा यांनी प्रकाश टाकला आहे.

Visit : Policenama.com