Rajesh Shah | ‘भारतीय उद्योग व्यापार मंडळ’ या देश पातळीवरील संस्थेच्या ‘राष्ट्रीय सहमंत्री’ पदावर राजेश शहा यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यापार क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था असलेल्या ‘भारतीय उद्योग व्यापार मंडळ’ (Indian Chamber of Commerce and Industry) या देश पातळीवरील संस्थेच्या ‘राष्ट्रीय सहमंत्री’ या पदावर प्रसिद्ध व्यापारी व जयराज ग्रुपचे संचालक (Jayaraj Group Director) राजेश शहा (Rajesh Shah) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी बाबतचे पत्र भारतीय उद्योग व्यापार मंडळ या संस्थेचे राष्ट्रीय चेअरमेन बाबुलाल गुप्ता (National Chairman Babulal Gupta), राष्ट्रीय अध्यक्ष विजय प्रकाश जैन (National President Vijay Prakash Jain) व राष्ट्रीय वरिष्ठ महामंत्री मुकुंद मिश्रा (Mukund Mishra) यांनी राजेश शहा (Rajesh Shah) यांना प्रदान केले. या निवडीमुळे सध्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील अनेक व्यापारी, सामाजिक संस्थांच्या महत्वाच्या पदांवर सक्रिय असणाऱ्या राजेश शहा यांच्या राष्ट्रीय पातळीवरील सार्वजनीक कामाची सुरुवात झाली आहे.

राजेश शहा (Rajesh Shah) यांची वयाच्या 39 व्या वर्षी पूना मर्चंट चेंबर च्या (Poona Merchant Chamber) स्वर्णमहोत्सवी वर्षात सन 1997-99 मध्ये चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. चेंबरच्या आजवरच्या इतिहासात सर्वात युवा अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच राजेश शहा हे पूना ब्लाईन्ड मेन्स असोसिएशन (Poona Blind Men’s Association) व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल (H. V. Desai Eye Hospital) या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

सन 2003 पासुन सलग महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ
असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र Federation of Associations of Maharashtra (फाम – FAM) चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पहात आहेत.
त्याचबरोबर श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार,
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या संस्थेचे महासचिव आहेत.
श्री महावीर जैन विद्यालय, पूना हॉस्पिटल, पूना गुजराती केळवाणी मंडळ, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
इत्यादी सामाजिक व शैक्षणिक संस्थाचे ते विश्वस्त आहेत. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा यांनी दिली.

Web Title :-Rajesh Shah | rajesh shah as national joint secretary of indian chamber of commerce and industry