नोकरीची संधी ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात 16 हजार पदांची होणार भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये डॉक्टर्स, वॉर्डबॉय, ड्रायव्हरसह इतर पदे भरली जाणार आहेत.

राज्यातील आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘अ वर्गाची परीक्षा MPSC च्या माध्यमातून घेतली जाईल. ब वर्गात डॉक्टर्सच्या मुलाखती घेऊन पदभरती केली जाईल. क आणि ड वर्गाची परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेतली जाईल. याशिवाय ॲडमिनिस्ट्रेशनच्या जागाही भरल्या जातील. ही पदे भरल्यानंतर आरोग्य विभागात स्थिरता निर्माण होईल. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार आणि क, ड वर्गातील प्रत्येकी 12 हजार पदे भरणार आहोत. यामध्ये डॉक्टर्स, ॲडमिनिस्ट्रेशनसह वॉर्ड बॉय, ड्रायव्हर यासारखी पदे असतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने अंतर्भाव करण्याची गरज आहे. काही ठिकाणी रेमडेसिव्हिरचा 900 रूपये दर आहे. तर काही ठिकाणी काही कंपन्यांचा 3,000 रुपये दर आहे. हा दर कमी करण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे आता केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

रेमडेसिव्हिरचे वाटप न्यायपद्धतीने सुरु…

रेमडेसिव्हिरचे वाटप न्यायपद्धतीने केले जात आहे. प्रश्न फक्त कोव्हॅक्सिनचा आहे. कोव्हिशिल्डबाबत कोणतीही अडचण नाही. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारने आधीच इशारा दिला आहे. कर्नाटकचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे टोपे यांनी सांगितले.