Rajesh Tope | ‘मास्क वापरण्याचं आवाहन, परंतु सक्ती नसणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona in Maharashtra) पार्श्वभूमीवर मास्क (Mask) सक्ती करण्यात आल्याचं वृत्त पसरलं होतं. आरोग्य सचिवांनी (Secretary of Health) काढलेल्या पत्रात त्याबाबत नमुद करण्यात आलं होतं. दरम्यान, कोणत्याही प्रकारची मास्क सक्ती नसल्याचं पुन्हा स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

 

माध्यमांशी बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, “आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट (Must) असं म्हटलं आल्याने राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. परंतु, हा मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं (Media) लोकांना सांगावं. त्यामुळे मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे

 

“आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई (Mumbai), पुणे (Pune), पालघर (Palghar) आणि रायगड (Raigad), ठाणे (Thane) आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य विभागाने (Central Health Department) आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील.” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

Web Title :- Rajesh Tope | appeal to use masks in the maharashtra its not compulsory health minister rajesh tope

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा