Rajesh Tope | कोरोनाची तिसरी लाट सुरू, पिकवर कधी असेल? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | राज्यात दैनंदिन कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात राज्य सरकारने (Maharashtra Government) काही निर्बंध (Restrictions) लागू केले आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती बाबत महत्वपुर्ण माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर टोपे यांनी या बैठकीतील चर्चेची सविस्तर माहिती दिली आहे.

 

राज्यात कोरोनाच्या लाटेची स्थिती काय आहे? याचा पिक पॉईंट (Pick Point) कधी असेल? असे अनेक सवाल सध्या नागरिकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहेत. ‘देशभरात कोरोनाची तिसरी लाट सुरु झालेली आहे. या लाटेची सर्वोच्च स्थिती कधी असेल हे पहावं लागेल. कालच राज्यात 45 हजार रुग्णांची नोंद झाली होती, आजही त्यात वाढ होईल. या रोजच्या संख्येचा आकडा केव्हा सर्वोच्चस्थानी जाईल हे पहावं लागेल. दुसऱ्या लाटेमध्ये दररोज सुमारे 65 हजार रुग्णांची नोंद होत होती तो त्यावेळचा पिकपॉईंट होता, त्यानंतर हा आकडा खाली आला. असं टोपे म्हणाले.

 

दरम्यान, मात्र, तिसऱ्या लाटेचा पिकपॉईंट हा दररोज किती लोक पॉझिटिव्ह येतील त्यावर ठरणार आहे, पण याचा आज आंदाज बांधणं शक्य नाही. पण तो कदाचित जानेवारीच्या शेवटापर्यंत येईल त्यानंतर पॉझिटिव्हीटीचा दर (Positivity Rate) खाली जाईल, असं तज्ज्ञांच्या चर्चेतील मत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Web Title :- Rajesh Tope | Corona third wave already started when will be pickpoint maharashtra health minister rajesh tope answered

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Yojana | फक्त 100 रूपयानं गुंतवूणक सुरू करून 5 वर्षात मिळवा 20 लाख रुपये, जाणून घ्या कसे

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ! शिरसाई मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड, 25 मंदिरातील चोरीचे गुन्हे उघड