Rajesh Tope | लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आणि RT-PCR सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात ‘एंट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची (Corona third wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात येणार नाहीत. सध्या जे नियम आहेत तेच नियम सुरु राहणार आहेत असे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं. तसेच लसीचे दोन डोस घेतले असतील आणि ज्यांच्याकडे आरटीपीसीआर सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

Rajesh Tope | entry in maharashtra will be given only to those who have taken two doses rajesh topes big statement

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात सध्या सुरु असलेले निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जातील अशी शक्यता होती. परंतु राज्यातील निर्बंध ‘जैसे थे’च परिस्थिती ठेवण्यावरच सरकारचा कल असल्याचे पाहायला मिळाले.

10 जिल्ह्यात 92 % रुग्ण

देशाच्या तुलनेत राज्यात आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. मागील तीन आठवड्यांत रुग्ण संख्या स्थिर आहे. परंतु राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे लेव्हल-3 मध्ये अनेक जिल्हे आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार

राज्यातील ज्या व्यापाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी दुकाने खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरत आहे. परंतु नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

यांनाच महाराष्ट्रात प्रवेश

यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीकडून RTPCR चाचणीचं सर्टिफिकेट घेतले जात होते. परंतु, आता
यापुढे कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल अशांनाच
महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत
दिली.

तर पुन्हा कडक निर्बंध लागू करा

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा
इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नसल्याचे पहायला मिळत आहे. राज्यांनी कोरोनाचे निर्बंध
शिथिल केल्यानंतर लोकांनी पर्यटनस्थळे आणि बाजार पेठांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याच्या
सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

हे देखील वाचा

Facebook यूजर्ससाठी मोठी खुशखबर ! आता मिळेल हमखास कमाईची संधी, जाणून घ्या काय करावे लागेल?

EPFO | खुशखबर ! PF खातेधारक आता घरबसल्या अपडेट करू शकतात बँक डिटेल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rajesh Tope | entry in maharashtra will be given only to those who have taken two doses rajesh topes big statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update