Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Coronavirus) वेग वाढताना दिसत आहे. दैनंदिन कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणाची चिंता लागली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राज्य सरकारने (Maharashtra Government) काही निर्बंध (Restrictions) देखील लावले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल महत्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती दिली आहे. ”राज्यातल्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे आणि राज्यातली एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं यासाठी शासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे.” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. परंतु, यामध्ये काल काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. काल दिवसभरात राज्यात 39,207 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर, 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 38,824 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल एकाही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत राज्यात 1860 ओमायक्रॉन बाधित सापडले. त्यापैकी 1001 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

 

Web Title :- Rajesh Tope | health minister rajesh tope covid 19 updates in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा