Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘…त्या दिवशी संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन लागू केला जाईल’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. राज्यात 15 ऑगस्ट पासून रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. याविषयी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet meeting) बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुंबईतील लोकल प्रवास (Mumbai local travel), हॉटेल, नाट्यगृहे, रेस्टॉरंट्स, मॉल्स, मंगल कार्यालये याबाबत नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली. तिसऱ्या लाटेदरम्यान (third wave) परिस्थिती अधिक बिघडल्यास संपूर्ण राज्यात पुन्हा कठोर लॉकडाऊन (Strict lockdown) लागू करण्याचे सुतोवाच राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यावेळी केले. तसेच तिसऱ्या लाटेदरम्यान, परिस्थितीनुरुप निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

राज्यात 3800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या परिस्थितीवर लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यामध्ये उत्पादित होणारा एकूण लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen) 1300 मेट्रिक टन आहे. तर औद्योगिक क्षेत्राने अजून 200-300 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याची खात्री दिली असून तशी वाढ केली जात आहे. राज्यात एकूण 450 पीएसए प्लांट्सची (PSA plants) ऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी 141 प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण क्षमता वापरली तरी 1700-2000 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन निर्मिती होऊ शकणार आहे. केंद्राच्या सुचनेप्रमाणे दुसऱ्या लाटेचा पीक होता, त्याच्या दीडपट व्यवस्था करुन ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्याला 3800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू शकतो, असे टोपे यांनी सांगितले.

… त्या दिवशी राज्यात कठोर लॉकडाऊन

राजेश टोपे यांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत सांगताना राज्यातील लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. ऑक्सिजनच्या अशा परिस्थितीमुळे असा निर्णय घेण्यात आला आहे, की तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी राज्यात 700 मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात ऑटो मोडवर कठोर लॉकडाऊन (Strict lockdown on auto mode) लागू केला जाईल. इतर राज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त प्रमाणावर लागत असल्याने, केंद्राकडून राज्याला वेळेवर मदत मिळू शकेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या संदर्भात आपण हा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

लग्न सोहळ्याला 200 जणांना परवानगी

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, उपहारगृहे यांना क्षमतेच्या 50 टक्क्यापर्यंत मान्यता देण्यात आली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉन या ठिकाणी होणारे विवाहसोहळे यांना जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असले. तर हॉलच्या आसन क्षमतेनुसार 50 टक्के परवानगी देण्यात आली आहे. 100 पेक्षा अधिक जणांना परवानगी राहणार नाही.

खासगी कार्यालये 24 तास सुरु राहतील

शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक, रेल्वे कर्मचारी यांना प्राधान्याने लस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय जी खासगी कार्यालये आहेत, त्याठिकाणी 24 तास खासगी कार्यालये सुरु राहू शकतील, हा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला. एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा खासगी कार्यालयांनी गरजेनुसार एका सत्रात 25 टक्के उपस्थिती ठेवली, तर खासगी कार्यालये सुरु ठेवता येतील, अशी सूचना देण्यात आली आहे.

 

Web Title : Rajesh Tope | health minister rajesh tope restrictions oxygen availability strict lockdown in

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Online Banking | ‘या’ 7 ऑनलाइन धोकादायक बनावट बँकिंग लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने सुद्धा केले सावध; जाणून घ्या डिटेल

Dr. Pratibha Shinde | वाई नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदेंना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Crime News | 3 महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या तरूणाने केली आत्महत्या, प्रचंड खळबळ