Rajesh Tope | ‘तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला’ ! राजेश टोपे म्हणाले – ‘नवीन व्हेरियंट अजून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | मागील काही दिवस कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत वाढ दिसून आली. दरम्यान सध्या कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत पुन्हा घट होऊ लागली आहे, सर्वत्र तिसरी लाट आली आहे अशी चर्चा होऊ लागली. दरम्यान याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे ”राज्यातील काही भागांमध्ये अजूनही रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा शहरांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी रूग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला असल्याचं ते म्हणाले.

 

”शहरातील रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागातही रूग्ण वाढत आहेत. परंतु, वाढणारे रूग्ण 5 ते 7 दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही”, असं राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. तसेच, ”सध्या नवीन व्हेरियंटची (New Variant) चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) त्यावर संशोधन करत आहे. नवा व्हेरियंट जास्त घातक आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु नवीन व्हेरियंटचा रुग्ण अजून कुठेच आढळला नाही. त्यामुळे जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. असं ते म्हणाले.

 

”तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली होती.
रूग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, राज्यातील 92 ते 95 टक्के बेड अजुन रिक्त आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेले केवळ 5 ते 7 टक्केच रूग्ण बेडवर आहेत.
ICU, ऑक्सिजनवरचे रुग्ण तर केवळ 1 टक्के आहेत.
काही बाधित रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही.
परंतु, कोरोनाचे संकट अजून पूर्ण टळले नसल्याने काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोेपे म्हणाले.

 

Web Title :- Rajesh Tope | height of corona third wave came and went say maharashtra health minister rajesh tope

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा