Rajesh Tope | राज्याची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल? चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं बंद होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल राज्यात 36 हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच रुग्ण संख्या वाढत असताना त्यांनी धोक्याचा इशारा (Warning) ही दिला आहे. ते जालना येथे बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करायला पाहिजेत.
याशिवाय निर्बंध (Restriction) कडक करावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरुन जाऊ नये.
ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री (CM) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.
यावर तेच निर्णय घेतील, असेही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

 

चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं यांच्यावर निर्बंधाची गरज नाही

देशात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून 8 दिवसांत 1 लाख 17 हजार रुग्ण आढळून आले आहे.
यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्ग कमी होईल. चित्रपट (Cinema), नाट्यगृह (Theater), मंदिर (Temples) याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील.
परंतु या ठिकाणावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

 

धारावीत प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड

धारावीमध्ये (Dharavi) 1 हजार रुपयात लस घेतल्याच प्रमाणपत्र (Vaccination Certificate) देणारी टोळी पकडली आहे.
त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक झाल्याचे टोपे यांनी मान्य केलं असून चर्चा होत असतात मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असेही टोपे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव जात असतात त्यांच्याकडे गेलेला प्रस्ताव मान्य झाल्यानंतरच अधिसूचना (Notification) काढली जाते, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.

Web Title :- Rajesh Tope | maharashtra health minister rajesh tope appeals not to worry about coronavirus and lockdown

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Payments | इंटरनेटशिवाय सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

 

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य