Rajesh Tope | दिलासादायक ! ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात ओसरणार’ – राजेश टोपे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या वाढताना दिसत होती. सध्या त्यामध्ये घट होत आहे. त्याचबरोबर राज्यातील मृत्यूदरातही (Mortality) घट होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. राज्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात येत असल्याने निर्बंधातही सूट देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट (Covid Third Wave) केव्हा ओसरणार? यासंदर्भात अनेक सवाल उपस्थित होत असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यावेळी ते जालन्यात (Jalna) माध्यमांशी बोलत होते.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ”शासनाचा कल हा निर्बंध कमी करण्याकडे असून जे काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) आणि पुण्यातही (Pune) संख्या कमी होत असल्याचं दिसत आहे. काही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी निर्बंध कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे,” अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ”सध्या राज्यात राज्य शासनाकडून (Maharashtra Government)
लावण्यात आलेले निर्बंध (Restrictions) टप्प्याटप्प्याने कमी होताहेत. दर आठवड्याला आता निर्बंध कमी होत असल्याचं यापुढे पाहायला मिळेल.
तर मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ असं तज्ञांच्या मतावरून आपल्याला वाटत आहे.
त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल.”

 

Web Title :- Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope gives important information about coronavirus third wave in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | BJP आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप; ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून केला वापर’

 

Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look | ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील अजय देवगनचं फर्स्ट लूक झालं प्रदर्शित, व्हायरल झाली त्याची मनोरंजक नवाबी स्टाईल !

 

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

 

Amruta Fadnavis | मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 % घटस्फोट ! अमृता फडणवीस महिलांच्या प्रायव्हसीवर बोलल्या; म्हणाल्या – ‘माझे मानसिक संतुलन ढासळलेले नाहीय’