Rajesh Tope | ‘कोरोना’ची लाट कधी ओसरणार? आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती, म्हणाले…

पंढरपुर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा नियोकोव्हा हा नवा व्हेरिएंट (Neokova Corona New Variant) पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट (Corona Wave) संपुष्टात येऊ शकते, अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. राजेश टोपे (Rajesh Tope) पंढरपुरमध्ये (Pandharpur) बोलत होते.

 

लता मंगेशकर यांच्य प्रकृतीबाबत माहिती देताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांची प्रकृती स्थिर असून लतादीदी यांना लावण्यात आलेली कृत्रिम श्वसनव्यवस्था काढण्यात आली आहे. त्यामुळे लतादीदी (Latadidi) यांची प्रकृती सुधारत असल्याचे टोपे यांनी सांगितले. टोपे यांनी पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी (Sri Vitthal-Rukmini) मातेचे मुखदर्शन घेतले.

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, नियोकोव्ह हा नवा व्हेरीएंट चीनमधून (China) आला आहे.
याबाबतची जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) अद्याप माहिती मिळालेली नाही.
परंतु या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. पण सध्या या नव्या विषाणूचा एकही रुग्ण आपल्या देशात नाही.
त्यामुळे सध्यातरी कोणतीही चिंता नाही. तसेच मास्कमुक्ती (Mask) सध्या राज्यात नाही.
सध्य संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावतीपर्य़ंत Corona लाट संपुष्टात येऊ शकते.
असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन टोपे यांनी केले.

 

Web Title :- Rajesh Tope | march mid corona wave will end says maharashtra health minister rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला गजाआड

 

Pune Crime | गांजा विक्री करताना सराईत गुन्हेगाराला अटक, मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई

 

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी