Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे

जालना: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पण त्यावरून पुन्हा एकदा मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे; ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असा इशारा राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

तसेच शरद पवारांच्या सुरक्षेतही वाढ करण्याची मागणी टोपे यांनी केली आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अज्ञाताने फोन केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. त्यावर बोलताना टोपे (Rajesh Tope) म्हणाले, वारंवार फोन करून एक माथेफिरु पवारांना शिव्या देत आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा. पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असून, शरद पवारांच्‍या सुरक्षेत वाढ करण्यात यावी.

धमकी देणाऱ्याने आपण देशी कट्ट्याने शरद पवार यांना ठार मारू, असे म्हंटले होते.
याप्रकरणी सिल्वर ओकवरील ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात सदर व्यक्तीविरोधात भा. द. वि. 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे.

Web Title :- Rajesh Tope | ncp leader rajesh tope warns the government on the threat to sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यातील मुक मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंची वेगळीच मागणी, म्हणाले…