Rajesh Tope | राज्यात लॉकडाऊन होणार नाही? राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या पार गेला आहे. तर एकट्या मुंबईने (Corona in Mumbai) 20 हजारांचा आकडा क्रॅस केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) राज्यात मिनी लॉकडाऊनची (Mini Lockdown) घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असणार आहे. तर सकाळी 5 ते रात्री 11 जमावबंधी लागू असणार आहे. या निर्बंधानंतर राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरु झाली असताना राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) जालना येथे बोलत होते.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णसंख्या दवाखान्यात जास्त वाढत नाही तोपर्यंत आज लावलेल्या निर्बंधापेक्षा आणखी निर्बंध (Restrictions) वाढवण्याची गरज वाटत नाही.
त्यामळे आता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.
यासाठी साधी लक्षणं असल्यास घरीच उपचार घ्या, मास्कचा वापर करा, एवढंच नाही तर गरम पाणी आणि व्यायामही करण्याचा सल्ला टोपे यांनी दिला आहे.

 

गर्दी टाळण्याचे आवाहन
महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी निर्बंध पाळा, गर्दी टाळण्याचं व लसीकरण (Vaccination) करुन घेण्याचं कळकळीचं आवाहन राजेश टोपे यांनी केले.
दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्र्यांनी (CM) मान्यता दिल्यानंतर आज रात्री पासून निर्बंध लागू झाले.
5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होता येणार नाही. गर्दी टाळणे हाच महत्त्वाचा भाग असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

 

परीक्षा वेळेवरच होतील
रुग्णांची संख्या दोन ते तीन दिवसात दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात होत आहे.
काल पर्यंत 40 ते 45 हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे क्रमप्राप्त असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात आता दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु, शाळा कॉलेजेस पूर्णत: बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी परीक्षा वेळेवरच होतील असेही टोपे यांनी सांगितले.

 

Web Title :-  Rajesh Tope | no lockdown in the maharashtra important information given by rajesh tope

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Dhongade | ‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

 

Coronavirus Restrictions | सगळं सुरु मग ब्युटी पार्लर आणि जीम का बंद? वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

 

Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज