राज्यातील Lockdown ची कठोर अंमलबजावणी करा, पोलिस प्रशासनाला सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता १ मे चा असणारा लॉकडाऊन राज्य सरकारने १५ मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने लागू केलेल्या निर्बंधाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तर हे निर्बंध कठोरपणे पाळण्यात यावेत असे पोलीस यंत्रणेला सांगितले, हे सर्व जनतेच्या आरोग्यरक्षणासाठीच करण्यात येत असल्याने जनतेनेही सहकार्य करण्याचे आवाहन टोपे यांनी दिले आहे.

राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात आज १७१५ मे. टन प्राणवायूची आवश्यकता आहे, तर तेवढा प्राणवायू पुरवठा होता आहे असे ते म्हणाले, तर असे असेल तरी प्राणवायूचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना सर्व हॉस्पिटलायाना दिल्या आहेत. प्राणवायूची गळती अथवा अन्य लॉस रोखण्यासाठी प्राणवायू नर्स ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा देखील सुयोग्य वापर करणे, तसेच अनावश्यक वापर निश्चित टाळला पाहिजे. ज्या छोटय़ा शहरांत मोठय़ा आरोग्यसुविधा नाहीत तिथे टेलिमेडिसीन सुविधा सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भाजपच्या नेत्यांनीही लसीच्या पुरवठयाबाबतचा विषय केंद्र सरकारकडे मांडावा –
महाराष्ट्रात १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. तरी लसींचा तुटवडा जाणवत आहे. सिरमच्या कोव्हीशिल्डने फक्त ३ लाख लसींची खरेदी ऑर्डर दिली गेली आहे. तर आम्हाला १२ कोटी लसींची आवश्यकता आहे. यामुळे पैसे एका चेकद्वारे देण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शविली आहे. केंद्र सरकारकडे वारंवार हा विषय मांडण्यात आला आहे. कदाचित केंद्र सरकारकडेच लस उपलब्ध नसण्याची शक्यता असू शकेल. पुढे टोपे म्हणाले, राज्यातील भाजपाच्या नेत्यांनाही आपले आवाहन आहे की सर्वजण एकत्र येउन आपण केंद्र सरकारकडे ही मागणी मांडू. तर एकत्रित २० ते २५ लाख लसी जेव्हा राज्य सरकारला उपलब्ध होतील तेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम प्रारंभ करू असे टोपे म्हणाले, तसेच, १८ वर्षांपासून पुढील वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येणार असली तरी त्यातही प्राथमिकता ठरविण्याचा विचार सुरू असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे.

या दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देताना राजेश टोपे म्हणाले, राज्यात होणारे अंत्यसंस्कार हे सन्मानपूर्वकच झाले पाहिजेत. शववाहिन्यांचीही उपलब्धता झाली पाहिजे. तसेच आढावा बैठकीत रूग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरला ऑडिट करण्याच्या तसेच ते झाले की नाही हे तपासण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.