Rajesh Tope | घाबरू नका ! पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope | कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) मोठ्या प्रमाणात सुरु असतानाही युरोपातील शाळा सुरु आहेत. राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या अधिक असली तरी रुग्णालयातील ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे बाधितांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा (Maharashtra School Reopen) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनीही घाबरून न जाता मुलांना सर्व दक्षता घेऊन शाळेत पाठवावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.

 

मंत्री टोपे हे रविवारी जालना येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक टाळाटाळ करत असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, युरोपातही कोरोनाची लाट सुरु आहे. पण तेथील शाळा सुरु आहेत. सातत्याने शाळा बंद ठेवल्या तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. मुलांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास करण्याचा हा प्रमुख कालावधी असतो. याच काळात जर मुले घरी राहिली तर त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळेच सर्व बाबींचा विचार करून शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बाधित रुग्णांची ज्या जिल्ह्यात अधिक संख्या असेल तेथे स्थानिक प्रशासन व पालकमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे. शाळेत येणाऱ्या मुलांची योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले असून कोणी कोरोनाबाधित आढळले, तर इतरांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. (Rajesh Tope)

राज्यातील रुग्णालयांची स्थिती पाहिली तर ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत.
आयसीयू किंवा ऑक्सिजन बेड हे ९५ टक्के रिकामे आहेत.
साधारण ९० टक्के बाधित होम आयसोलेशनमध्ये आहेत.
त्यामुळे हे जर असेच प्रमाण राहिले तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंधही कमी केले जाऊ शकतात.
लसीकरणाची कोणालाही सक्ती नाही पण आम्ही लसीकरण करावे असे नागरिकांना आवाहन करून लसीकरण करण्यास भाग पाडू, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Rajesh Tope | parents should send their children to school without fear maharashtra health minister rajesh tope

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात प्या पोषक तत्वांनी भरलेले ‘हे’ चीज सूप, जाणून घ्या याची रेसिपी