PM मोदींच्या आवाहनानंतर राजेश टोपेंनी दिली माहिती, म्हणाले – ‘राज्यात Lockdown लागणार नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन लावणारा का? या बाबत अनेक चर्चा मागील २ दिवसापासून रंगल्या असतानाच या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, तर निर्बंध आणखी कठोर केले जाणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राजेश टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जरी सांगितलं असेल की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून सांगितला असेल तरी मला असं वाटतं की, राज्यातील परिस्थिती पाहता राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर ‘ब्रेक द चेन’ करुन ही साखळी तोडणार आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळाने भूमिका मांडली की आपल्याला लॉकडाऊन करुन ही साखळी तोडावी लागेल. त्या अनुषंगाने आता राज्यात लॉकडाऊन हा जरी शब्द नसला तरी ‘ब्रेक द चेन’ नुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. असे टोपे यांनी सांगितलं आहे.

पुढे टोपे म्हणाले, मास ट्रान्सपोर्टेशन आणि अत्यावश्यक सेवा वगळता आता ज्या गोष्टी सुरू आहेत त्या बंद करण्यात येतील. बस सेवा, रेल्वे सेवा बंद राहणार नाहीये या सेवा सुरू राहतील. या बाबत नियमावली लवकरच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, संपूर्ण जिल्हा बंदी करण्यात येणार नाही तर कठोर नियम लागू करण्यात येणार खूपच अत्यावश्यक असेल तरच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर नागरिकांना जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यामागचं कारण विचारलं जाणार अस आवश्यक असेल तर परवानगी देण्यात येईल. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.