Rajesh Tope | राज्यातील शाळा पुन्हा कधी सुरु होणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह (Education Experts) अनेकांनी शाळा सुरु (School Reopen) करण्याची मागणी केली आहे. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठे विधान केले आहे. शाळा पुन्हा सुरु होणार की नाही, कधी पासून सुरु होणार याबाबत राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात भाष्य केलं आहे.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, मला असं वाटतं, एकंदर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे, मुलांना कोरोनाची लागण (Corona Infection) होण्याचे प्रमाण कमी आहे. याबद्दल कॅबिनेट बैठकीतही (Cabinet Meeting) भरपूर चर्चा झाली आणि या चर्चेतून एवढंच ठरलं की आता 10 ते 15 दिवस शाळा बंदच राहतील. तोपर्यंत राज्यातली परिस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा करुन विचार करुन आणि 15 दिवसानंतरची परिस्थिती पाहून शाळा पुन्हा सुरु करायच्या की बंद करायच्या याविषयीचा निर्णय घेतला जाईल.

 

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. ब्रीच कँडी च्या मॅनेजमेंटला (Breach Candy Management) त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृती संदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि लता मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करुन आरोग्य विषक माहिती माध्यमांना देतील, असेही टोपे म्हणाले.

 

Web Title :- Rajesh Tope | When will schools in maharashtra resume Health Minister Rajesh Tope s big statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा