Rajeshwari Kharat | ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातला नेटकऱ्यांनी ‘त्या’ व्हिडिओवरून केले ट्रोल; म्हणाले – ‘हे असले चाळे…’
पोलीसनामा ऑनलाइन : Rajeshwari Kharat | नागराज मंजुळे यांचा गाजलेला ‘फँड्री’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचे समाजवास्तव्य नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांसमोर मांडले होते. या चित्रपटातून शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला चांगलीच पसंती मिळाली होती. राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकताच राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. (Rajeshwari Kharat)
राजेश्वरीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. ती तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘डर्टी लिटल सिक्रेट’ या गाण्यावरचा एक व्हिडिओ नुकताच तिने शेअर केला आहे. यामध्ये राजेश्वरीचे दोन लुक पाहायला मिळत आहेत. पहिल्या लुक मध्ये तिने जीन्स व क्रॉप टॉप घातला आहे तर दुसऱ्या लुक मध्ये तिने डीप नेक वन पीस परिधान केला आहे. मात्र राजेश्वरीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नसल्याचे दिसत आहे. राजेश्वरीच्या या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. (Rajeshwari Kharat)
राजेश्वरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होताना दिसत आहे.
व्हिडिओवर एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की, “हे असे चाळे चालणार नाही शालू समजलं का नाही तर….”
तर दुसऱ्या एका युजरने म्हटले “म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात”.
तर एका दुसऱ्या युजरने म्हटले “शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं”.
“चांगल्या करिअरसाठी अॅक्टिंगवर लक्ष दे, अशा रील्स बनवत बसू नकोस”, “अंग वळत नाही व्यायामं करावा!”
अशा एक ना अनेक कमेंट सध्या तिच्या या व्हिडिओवर पहायला मिळत आहेत.
राजेश्वरीने फँड्री या चित्रपटानंतर ‘आयटमगिरी’, तसेच ‘रेडलाइट’ या शॉर्ट फिल्म मध्ये देखील झळकली होती.
Web Title :- Rajeshwari Kharat | fandry fame rajeshwari kharat trolled over her dance reel check details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nashik Crime News | आई-बाबांना शेतात मदत करायला गेली असताना 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू