Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला (Rajgad Fort) या राज्य संरक्षित स्मारक (State Protected Monument) परिसरामध्ये पर्यटकांना (Pune Tourism) रात्रीचा मुक्काम (Overnight Stay) करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये सचालनालयाच्या वतीने ही बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या आदेशानुसार राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पर्यटकांना तसेच कोणत्याही व्यक्तीला रात्राचा मुक्काम करता येणार नाही. या आदेशाची प्रत स्मारकाच्या दर्शनी भागावर फलकावर लावली आहे.

 

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. काही पर्यटक रात्रीच्या मुक्कामासाठी किल्ल्यावर राहतात. त्यावेळी ते तिथे भोजन बनवून अनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देत होते. तसेच महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसत असल्यामुळे किल्ल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढले होते. त्यामुळे किल्ल्याच्या पावित्र्याला धोका पोहोचत असल्याने रात्रीच्या वेळेस पर्यटक, लोक यांना मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

नियमाचे उल्लंघन केल्यास…
जो कोणी पर्यटक/लोक या नियमांचे उल्लंघन करतील त्याला, महाराष्ट्र,
प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 मधील कलम 33 (1) अन्वये तीन महिने कैद किंवा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा होतील.

 

Web Title :- Rajgad Fort | night stay and trekking at this rajgad fort in pune district is prohibited pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू