Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा

पुणे / खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Rajgad Police Station । पुणे-सातारा (Pune-Satara) रस्त्यावर खेड-शिवापूर (Khed-Shivapur) (ता. हवेली) येथे पोलिसांनी रविवारी (20 जून) गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. तर या ट्रकमधील सुमारे 39 लाख 37 हजार 500 रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई राजगड पोलिसांनी (Rajgad Police) केली आहे. तसेच गुटखा आणि गुटखा वाहतूक करणारा ट्रक असा सुमारे 51 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक राजेंद्र मारुती पाटील (वय 43, रा. सुरुपली, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा (Pune-Satara) महामार्गावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने गुटखा वाहतूक करणारा एक लाल रंगाचा ट्रक जाणार असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे (Rajgad Police Station) पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांना रविवारी सकाळी मिळाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्या माहितीनंतर पीआय संदीप घोरपडेसह पोलीस पथकांनी खेड-शिवापूर (Khed-Shivapur) टोल नाक्यावर नाकाबंदी लावली. आणि त्यावेळी वाहनांची तपासणी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार तो लाल ट्रक काही वेळाने पुण्याच्या दिशेला जात असल्याचे आढळून आले. त्यावेळी हा ट्रक पोलिसांनी बाजूला घेऊन त्या ट्रकची तपासणी केली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये गुटख्याची आणि सुगंधी तंबाखूची भरलेली पोती आढळून आलीत.

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

त्या ट्रकमध्ये आढळून आलेला सर्व ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.
त्यामध्ये, 39 लाख 37 हजार 500 रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू होती.
हा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि गुटखा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण सुमारे 51 लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे, फौजदार निखिल मगदूम, सहाय्यक फौजदार कृष्णा कदम, पोलिस हवलदार संतोष तोडकर, संतोष कालेकर, सोमनाथ जाधव या पथकाने केली आहे.

हे देखील वाचा

Coronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित ! देशात 88 दिवसानंतर आल्या इतक्या केस

Pune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला

ESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान 1800 रुपये मासिक पेन्शन, कामगार मंत्रालयाने नोटिफाय केली स्कीम


प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Rajgad Police Station | gutkha worth rs 3 lakh seized by pune rural police in khed shivapur area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update