राजगुरूनगर : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून धमकावणा-या सराईत गुन्हेगाराला अटक

राजगुरुनगर : पोलीसनामा आॅनलाइन

कुख्यात गुंड महेश भागवत खून खटल्यातील जामीनावर असलेला आरोपी मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल खेड पोलीसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले.

पोलीस अधिकाऱ्याकडून आमदार, खासदारांची जीभ छाटण्याची धमकी

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de37a744-befe-11e8-a778-875397b6b2c4′]

याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना दूरध्वनीवर माहिती मिळाली की एक व्यक्ती गावठी पिस्तुलाने वाडा रस्त्यावरील पाण्याची टाकी चौकात रिक्षावाला व पथारीवाले यांना धमकावत आहे. त्यानंतर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार आर के नलावडे, एस आर मांडवे, व्ही जे पाटील, एस जे बनकर आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल व १०० रुपयांचे एक जिवंत काडतूस मिळून आले.

भोसरी : बनाच्या ओढ्यात तरुणाचा खून

पोलीस नाईक राजेश नलावडे यांनी खेड पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात आर्म ऍक्ट कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.