‘बियर ग्रिल्स’चा सर्व्हाइवल शो ‘Into The Wild’ मध्ये ‘रजनीकांत’ एपिसोडनं रचला ‘इतिहास’ !

पोलीसनामा ऑनलाईन :अलीकडेच डिस्कवरी चॅनलवर इन टू द वाईल्ड विथ बियर ग्रिल्स या शोमध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत दिसले. शिवाजी स्टाईलमध्ये एन्ट्री आणि स्पोर्टी अंदाजातील रजनीकांत लोकांना खूप आवडले. अशी बातमी आहे की, रजनीकांतवाल्या या एपिसोडला यावर्षीचा टीव्ही शो जॉनरमध्ये सर्वाधिक रेटींग मिळाली आहे.

एका रिपोर्टनुसार, डिस्कवरी नेटवर्कच्या 12 वेगळ्या डिस्कवरी चॅनलपैकी इन टू द वाईल्ड विथ बियर ग्रिल्स रजनीकांत एपिसोडला या वर्षीच्या टीव्ही शो जॉनरमध्ये सर्वाधिक रेटींग मिळाली आहे. याशिवाय या जॉनरच्या इतिहासात सेकंड हाएस्ट रेटींग मिळाली आहे. या एपिसोडला 4 मिलियन म्हणजेच जवळपास 40 लाख इम्प्रेशन्स मिळाले आहेत.

23 मार्च 2020 रोजी झालेल्या या शोच्या प्रीमियरनं कोटींहून अधिक लोकांपर्यंत आपली पोहोच बनवली आहे. जी गेल्या 4 आठवड्यांच्या टीव्ही रिचपेक्षा 86 टक्के जास्त आहे या एपिसोडच्या प्रीमियरनं डिस्कवरी नेटवर्कला इनफोटेंमेंट जॉनरमध्ये 89 टक्के नफा मिळवून दिला आहे. गेल्या 4 आठवड्यांच्या तुलनेत स्लॉट व्ह्युअरशिप 5 टक्के अधिक होती.

या शोनं सोशल मीडियावर खूप आधीच अटेंशन घेतलं होतं. रजनीकांच्या फॅन्सनं ट्विटरवर थलायवाच्या नावनं ट्रेंड सुरू केला होता. या एपिसोडची शुटींग कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्वमध्ये करण्यात आली होती.