मनोरंजनमुंबई

Rajinikanth | मुलीच्या घटस्फोटामागोमाग सुपरस्टार रजनीकांत यांना आणखी एक धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajinikanth | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) अनेक चित्रपटामुळे आणि त्याच्या दिमाखदार स्टाईलमुळे चर्चेत आहे. रजनिकांत यांचे अनेक चित्रपट फेमस झाले आहे. त्याचबरोबर रजनिकांत यांचे अनेक चाहते आहेत. दरम्यान त्यांच्या आयुष्यात अनेक संकट उभे ठाकले असल्याचं दिसत आहे. हा अभिनेता सध्या काही तणावाच्या परिस्थितीतून जाताना दिसत आहे.

 

रजनिकांत (Rajinikanth) याची कन्या ऐश्वर्या (Aishwarya) आणि जावई धनुष (Dhanush) यांच्या नात्यात आलेला दुरावा, त्यांना चिंतेत आणण्यास कारणीभूत ठरला आहे. घटस्फोटाची ही ठिणगी विझवण्याचा प्रयत्न रजनीकांत करत आहेत. परंतु, तोच त्यांना आणखी एक धक्का मिळाला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. रजनिकांत यांना धक्का देणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आहे.

 

अभिनयाच्या कारकिर्दीत आपला उत्तम ठसा उमटवणाऱ्या अल्लू अर्जुनने (Allu Arjun) थलैवा रजनीकांत (Rajinikanth) यांना मागे टाकलं आहे. त्याचबरोबर सर्व भारतात त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की त्याच्या ट्विटर (Twitter) फॉलोअर्सचा आकडा 6.5 मिलियन वर पोहोचला आहे. तर, दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजिवी आणि रजनीकांत यांनाही त्याने मागे टाकलं आहे. रजनीकांत यांना ट्विटरवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

 

दरम्यान, चिरंजीवी यांना 1.2 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.
मागील काही काळापासून अल्लू अर्जुन ट्विटरवर चांगलाच सक्रिय झाला असल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सचा आकडा वाढला आहे.
तसेच, रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला आतापर्यंत फार कमी व्यक्तींनीच मागे टाकलं होतं.
आता त्याच लिस्टमध्ये अल्लू अर्जुनच्याही नावाची नोंद झाली आहे.

 

Web Title :-  Rajinikanth | pushpa fame actor allu arjun break record of rajinikanth download movie

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button