NPR वर रजनीकांतचा बिलकुल आक्षेप नाही, म्हणाले – ‘CAA मुळं मुसलमानांना काही एक धोका नाही’

0
20
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CAA विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. यादरम्यान अभिनेता सुपरस्टार रजनीकांतने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिले आहे. रजनीकांत म्हणाले की नागरिकत्व सुधारणा कायदा आपल्या देशातील नागरिकांवर परिणाम करणारा नाही, परंतु जर देशातील मुसलमानांवर याचा परिणाम होणार असेल तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा उभा राहणारा व्यक्ती मी असेल. देशाबाहेरुन आलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी एनपीआर आवश्यक आहे. एनआरसीबाबत स्पष्ट झाले आहे की अद्याप याची तयारी झालेली नाही.

रजनीकांत म्हणाले की, सीएएमुळे मुसलमानांना कोणताही धोका नाही. जर त्यांना काही अडचणी आल्या तर त्या विरोधात आवाज उठवणारा पहिला व्यक्ती मी असेल. रजनीकांत म्हणाले की केंद्र सरकारने आश्वासन दिले आहे की भारतीय लोकांना सीएएमुळे समस्या येणार नाहीत.

त्यांनी आरोप केला की काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएए विरोधात लोकांना भडकवत आहेत. त्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाला समर्थन देण्याऱ्या धार्मिक नेत्यांना जबाबदार धरले आहे आणि हे अत्यंत चूकीचे असल्याचे सांगितले. विभाजनानंतर जे मुसलमान भारतात अडकून पडले त्यांना देशाबाहेर कसे काढणार ?

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे समर्थनात रजनीकांत म्हणाले की हे अभियान अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेस नेतृत्वातील सरकाने देखील यापूर्वी असे केले होते.