रजनीकांत यांच्या पत्नीने घेतली राज ठाकरेंची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांची मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यानचे फोटो राज ठाकरे यांनी ट्विट देखील केले आहेत. तर या भेटी दरम्यान लता रजनीकांत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि सिनेमा अशा अनेक विषयांवर दीर्घ काळ चर्चा देखील झाल्याचे समजते. यामुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे.

[amazon_link asins=’B078R5N97L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’404b0183-7dda-11e8-b2ec-898aa24e1b7e’]

सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी चार दशकाहून आधिकाकाळ हिंदीसह तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून विविध भूमिका पार पाडत. रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. रजनीकांत यांचा चित्रपट सिनेमागृहात येण्या अगोदरचा हिट ठरलेला असतो. रजनीकांत यांनी मध्यतरी राजकारणात सक्रिय होण्याची भूमिका जाहीर केल्याने त्यावर देशाच्या राजकारणात दीर्घ काळ चर्चा देखील रंगली. या सर्व घडामोडी घडत असताना.आज सकाळी रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांची भेट घेतली. यामुळे सर्वत्र चर्चाना उधाण आले आहे.