Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Rajiv Gandhi Science City Pimpri | मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती विकसित होण्यासाठी भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी (Rajiv Gandhi Science City Pimpri) साकारण्यात आली आहे. देशातील कोलकाता आणि अहमदाबाद येथे ही नगरी आहे. त्यानंतर आता केंद्र आणि राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीमध्ये ही नगरी उभारण्यात येणार आहे. यासाठी २०० कोटींचे अनुदान मिळणार आहे.

२०१३ मध्ये चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टरजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाच्या मदतीने पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क उभारण्यात आला. त्याच्या यशस्वीतेनंतर राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय यांच्या सहाय्याने सायन्स सिटी उभारण्यचा विषय पुढे आला होता. त्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यासाठी ८ एकर जागा उपलब्ध आहे. त्यातील एक एकर जागेत विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र आहे. उर्वरीत सात एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत विज्ञान अविष्कार केंद्र असणार आहे. त्यासाठी १९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यासंदर्भात बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प होणार आहे.प्रकल्पामुळे शहराची नवी ओळख होणार आहे.

पिंपरी-चिंचवड सायन्सपार्कला मोठ्याप्रमाणावर नागरिक भेट देत असतात. सायन्स पार्क ही शहराची नवी
ओळख बनली आहे. विज्ञान अविष्कार केंद्राने शहराचा लौकिक वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडची विज्ञान केंद्रामुळे स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. वर्षाकाठी या केंद्रास सरासरी अडीच लाख विद्यार्थी भेट देतात.कोलकत्ता, अहमदाबाद येथे आता विज्ञान प्रकल्प आहे. शहरात अविष्कार नगरी उभारल्यास शहराच्या लौकिकात भर पडणार आहे.

असा आहे उद्देश

-विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव निर्माण व्हावा.

-विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे हा संकल्प.

-एकविसाव्या शतकातील कौशल्ये, जागतिक नागरिकत्व, उद्योग व उद्योजकता, बहु अनुशासनात्मक, अनुभवात्मक शिक्षण मिळवून देणे.

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! आता सरकार मजूरांना दर महिना देणार 3,000 रुपये पेन्शन! ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rajiv Gandhi Science City Pimpri | big decision state government rajiv gandhi science city be set pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update