परभणी लोकसभेसाठी राष्ट्रवादी कडून राजेश विटेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ११ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये परभणी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली असल्याने, सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्याचे सुरु केले आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदार संघांच्या  ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये परभणी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांच्या नावाची उमेदवारी निश्चित झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या ३० वर्षांपासून परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेने भगवा फडकावला आहे.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेने कडून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती तसेच राष्ट्रवादी कडून विजय भांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच टक्कर झाली होती. आणि आता राष्ट्रवादी कडून राजेश विटेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेने कडून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. आणि आता राष्ट्रवादी कडून राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. याचबरोबर भाजपा नेत्या मेघना बोर्डीकर अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मेघना बोर्डीकर यांनी अपक्ष उमेदवारी लढली तर परभणीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे परभणीच्या जागेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.